गंभीर गुन्ह्यातील आरोपींना दोन तासांत अटक; शिरूर पोलिसांच्या कारवाईचा धडाका

शिव स्पंदन न्यूज : प्रतिनिधी : शेतातील वादातून झालेल्या मारहाण प्रकरणात जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोन सराईत आरोपींना शिरूर पोलिसांनी वेगवान कारवाई करत अवघ्या दोन तासांत ताब्यात घेतले आहे. निमोणे परिसरात शेतातील पाण्याच्या बांधाच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. या वादातून काही जणांनी हल्ला करत गंभीर मारहाण केली. यावेळी संबंधितांना जीवे मारण्याची धमकी देत परिसरात दहशत…

Read More

शिरूर बाजारपेठेत पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन मोड’; चोरी रोखण्यासाठी गस्त, वाहतूक नियमभंगावर दंडात्मक कारवाई

शिव स्पंदन न्यूज : प्रतिनिधि : शिरूर शहरातील शनिवारच्या आठवडे बाजाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शिरूर पोलिसांकडून विशेष गस्त मोहीम राबविण्यात आली. पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवून गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात आले. शिरूर शहरातील मार्केट यार्ड येथे दर शनिवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात शिरूर शहरासह पंचक्रोशीतील नागरिक, शेतकरी तसेच अहिल्यानगर…

Read More

लग्नाच्या वादातून तीन वर्षीय चिमुकल्याची हत्या; रांजणगाव पोलिसांची तातडीने कारवाई;आरोपी अटकेत !

शिव स्पंदन न्यूज : प्रतिनिधि : रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारेगाव येथे लग्नास नकार दिल्याच्या रागातून एका तीन वर्षांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत कु. अंशु पप्पू कोल (वय ३ वर्षे) याचा मृत्यू झाला असून, या प्रकरणातील आरोपीला रांजणगाव पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी देवांशु आदित्य साहू…

Read More

सिताबाई थिटे डी. फार्मसीत आरोग्यसेवेचा स्तुत्य उपक्रम ; मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

शिव स्पंदन : प्रतिनिधि : श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डी.फार्म.) राष्ट्रीय सेवा योजना युनिट तसेच आनंदऋषीजी नेत्रालय व्हिजन सेंटर शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० जून रोजी जागतिक नेत्रदान दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी, चष्म्याचा नंबर तपासणी तसेच विविध…

Read More

अहेरी हल्ल्याच्या निषेधार्थ शिरूर नगरपरिषद अधिकारी – कर्मचाऱ्यांचा एल्गार

एक दिवस काम बंद ठेवत व्यक्त केला संताप; शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर कायद्याची मागणी शिव स्पंदन : प्रतिनिधी : अहेरी नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी श्री. वैभव पांढरे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ शिरूर नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय काम बंद आंदोलन करत घटनेचा तीव्र निषेध केला. शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून,…

Read More

रांजणगाव गणपती मंदिरासमोर ट्रॅव्हल बसला भीषण आग; बस जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली

शिव स्पंदन : प्रतिनिधि : रांजणगाव गणपती मंदिरासमोर उभी असलेल्या एका ट्रॅव्हल बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली. घटनेच्या वेळी परिसरात मोठी धावपळ उडाली. स्थानिक नागरिकांनी आणि मंदिर परिसरातील भाविकांनी तत्काळ सुरक्षित अंतर ठेवत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन…

Read More

शिरूर नगरपरिषदेची जोरदार कारवाई – शहरात थकीत करदारांवर विशेष मोहीम; मालमत्तांवर सील आणि जप्ती

शिव स्पंदन : प्रतिनिधि : शिरूर शिरूर नगरपरिषदेने थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीसाठी कडक भूमिका घेत शहरात विशेष वसुली मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांवर अखेर सील व जप्तीची कारवाई करण्यात आली असून, आज दि. ४ मार्च २०२६ रोजी सी. टी. बोरा कॉलेज रोड परिसरातील श्रीराम मार्केट…

Read More

शिरूर नगरपरिषद निवडणूक २०२५ : अजितदादा पवार यांच्या सभेची मोठी लगबग; माऊली कटके यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची दिशा बदलण्याचे संकेत

शिव स्पंदन : प्रतिनिधि : शिरूर शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)ने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. या प्रचार मोहिमेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या भव्य जाहीर सभेचे आयोजन केले आहे. ही जाहीर सभा २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पाचकंदील चौक येथे…

Read More

शिरूर प्रभाग ३ मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट)ची मजबूत पकड ? माऊली कटकेंच्या जनसंपर्क मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; सुनिल जाधव प्रचारात केंद्रस्थानी

शिव स्पंदन : प्रतिनिधि, शिरूर शिरूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने स्पष्टपणे प्रचारात आघाडी घेतल्याचे जाणवत आहे. विशेषत: प्रभाग क्र. ३ मध्ये पक्षाने मजबूत उपस्थिती निर्माण केली असून या प्रभागातील वातावरण सकारात्मकतेकडे झुकताना दिसत आहे.लोकप्रिय विद्यमान आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांनी प्रभाग क्र. ३ मध्ये नागरिकांशी…

Read More

शिरूर नगरपरिषद निवडणूक २०२५ : आमदार माऊली कटके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची विजयी सुरुवात

शिव स्पंदन : प्रतिनिधी : शिरूर ,दि. २४ नोव्हेंबर २०२५ शिरूर नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)च्या प्रचार मोहिमेला रविवार, दि. २३ रोजी आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या दमदार नेतृत्वाखाली उत्स्फूर्त सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते पालखी मार्ग या मुख्य रस्त्यावर भव्य रॅलीने शहरात निवडणुकीचा उत्साह चांगलाच…

Read More
error: Content is protected !!