शिव स्पंदन : प्रतिनिधी : शिरुर
गुप्त माहितीच्या आधारे शिरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने १२ सप्टेंबर रोजी उशिरा सायंकाळी राबवलेल्या मोहिमेत १९ वर्षीय तरुणाला मॅफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थासह अटक करण्यात आली. या कारवाईत एकूण ₹७२,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अचानक रचलेला सापळा :
पोलीस कॉन्स्टेबल विजय गजानन शिंदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पवन सागर भंडारे (वय १९, रा. वाडा कॉलनी, शिरूर) हा ॲक्टिव्हा स्कुटी क्रमांक MH 12 MT 6839 वरून नवीन शिरूर नगरपालिका परिसरात मॅफेड्रॉन विक्रीसाठी येणार होता.
हि माहिती तत्काळ मा. पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. त्यांनी पथक गठित करून पंचासमक्ष ठिकाणी सापळा लावण्याचे आदेश दिले.
आरोपीच्या अंगझडतीत मॅफेड्रॉन :
नवीन नगरपालिका परिसरात पोलिसांनी पाहणी करत असताना ॲक्टिव्हा स्कुटीवर संशयास्पद युवक दिसताच त्याला थांबवून विचारपूस केली. स्वत:चे नाव पवन सागर भंडारे असे सांगणाऱ्या त्या तरुणाच्या खिशात पंचासमक्ष घेतलेल्या झडतीत २ ग्रॅम ८० मिली पांढऱ्या रंगाचा मॅफेड्रॉन प्लास्टिकच्या पुडीत मिळून आला.
कायदेशीर कारवाई :
सदर अंमली पदार्थ आणि स्कुटी मिळून ₹७२,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजि. क्र. ६४७/२०२५ नोंदवण्यात आला आहे. गुन्हा NDPS कायदा 1985 कलम 8(क) आणि 21 अन्वये दाखल झाला असून आरोपीस १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिपक करांडे करत आहेत.
वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि पथकाची भूमिका :
संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप गिल्ल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत ढोले आणि मा. पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक करांडे, पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग, डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नितीन सुद्रीक, तसेच पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, सचिन भोई, निरज पिसाळ, निखील रावडे, पवन तायडे, भाऊसाहेब ठोसरे आणि अजय पाटील या सर्वांचा महत्त्वाचा सहभाग होता.


fantastic publish, very informative. I wonder why the opposite specialists of this sector do not understand this. You must continue your writing. I am confident, you’ve a great readers’ base already!