Home

शिरूर बसस्थानकावर दहा नव्या बससेवा : प्रिया बिरादार यांच्या नेतृत्वाने प्रवाशांचे प्रश्न सुटले

शिव स्पंदन : प्रतिनिधी , शिरुर : शिरूर शहरातील मुख्य एसटी बसस्थानकावर गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. बसची संख्या अपुरी असल्यामुळे ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी, नोकरीसाठी प्रवास करणारे कामगार तसेच जेष्ठ नागरिक यांना मोठी गैरसोय होत होती. त्यातच नियोजित वेळेत बस न लागणे, स्थानक परिसरातील अस्वच्छता, महिलांकडून शौचालयासाठी शुल्क आकारले…

Read More

शिरूरमध्ये पोलिसांची गुप्त धडक : १९ वर्षीय तरुणासह ₹ ७२ हजारांचा मॅफेड्रॉन माल जप्त

शिव स्पंदन : प्रतिनिधी : शिरुर गुप्त माहितीच्या आधारे शिरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने १२ सप्टेंबर रोजी उशिरा सायंकाळी राबवलेल्या मोहिमेत १९ वर्षीय तरुणाला मॅफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थासह अटक करण्यात आली. या कारवाईत एकूण ₹७२,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अचानक रचलेला सापळा : पोलीस कॉन्स्टेबल विजय गजानन शिंदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पवन सागर…

Read More

सविंदणे गावात कौटुंबिक वादातून मारहाण : महिला गंभीर जखमी

शिव स्पंदन : (प्रतिनिधी) : शिरूर, सविंदणे – शिरूर तालुक्यातील सविंदणे गावातील नाथ नगर वस्ती येथे कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. किशोरी विशाल लंघे (वय 38, रा. नाथ नगर वस्ती, सविंदणे) यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, दिनांक 12…

Read More

रांजणगाव एमआयडीसीत अचानक वादातून हिंसक हल्ला : तरुण गंभीर जखमी

शिव स्पंदन : (प्रतिनिधी) : शिरूर, रांजणगाव गणपती – गुरुवारी (११ सप्टेंबर) रात्री उशिरा रांजणगाव गणपती परिसरात एका तरुणावर टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विशाल बाळासाहेब कुटे (वय ३१, रा. मोडकाई वस्ती, रांजणगाव गणपती) यांच्यावर हा हल्ला झाला आहे. त्यांनी दिलेल्या…

Read More

शिरूर पोलिसांचा सज्जतेचा संदेश : शहरात कायदा-सुव्यवस्थेसाठी प्रभावी रूट मार्च

शिव स्पंदन : (प्रतिनिधी) : शिरूर, दि. १३ सप्टेंबर शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज (शनिवार) सायंकाळी ६.३० वाजेपासून ते ७.१५ वाजेपर्यंत शिरूर शहरात भव्य रूट मार्च काढण्यात आला. हा रूट मार्च माननीय श्री. प्रशांत ढोले (उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन काढण्यात आलेल्या या…

Read More

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी व नगरपरिषद कर्मचारी यांचा सन्मान सोहळा

शिव स्पंदन : प्रतिनिधी | शिरुर सण-उत्सव काळात नागरिकांचा आनंद अबाधित राहावा, शहरात सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या पोलीस बांधवांचा तसेच नगरपरिषदेकडून उत्तम नियोजन करून दिलेल्या विविध सोयी-सुविधा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने शिरूर येथे गौरव करण्यात आला. हा सोहळा त्यांच्या कार्यप्रवृत्तीस मान्यता देणारा विशेष उपक्रम ठरला. या विशेष सोहळ्यात शिरूर…

Read More

मराठी पत्रकार संघाचा प्रेरणादायी उपक्रम : समाजातील उत्कृष्ट कार्यकर्त्यांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन

शिरूर : प्रतिनिधी : शिरूर तालुक्यात मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित एका विशेष सोहळ्यात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच सामाजिक, उद्योग, शैक्षणिक, आध्यात्मिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमाला उपस्थित राहण्यासाठी समाजातील प्रमुख व्यक्तिमत्त्वे, अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते. सोहळ्याचे उद्घाटन प्रसिद्ध दानशूर उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल,…

Read More

डीजे – डॉल्बीला नकार, ढोल – ताशांच्या गजरातच गणेश विसर्जन करा : शिरुर पोलिसांचे आवाहन

शिरुर : शिव स्पंदन : प्रतिनिधी गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचत असताना शिरुर पोलिस स्टेशनने गणेश विसर्जन मिरवणुकीसंदर्भात महत्त्वाचे आवाहन केले आहे. यंदा विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे, डॉल्बी व लेझर लाईट्सचा वापर कडक बंदीस्त असून, फक्त पारंपरिक वाद्यांच्या गजरातच मिरवणुका काढाव्यात, असे निर्देश पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांनी दिले आहेत. 🚨 ध्वनीप्रदूषण गंभीर समस्या : शहरात…

Read More

शिरुर पोलिसांची मोठी कामगिरी : आठवड्याभरात खुनाचा पर्दाफाश : आरोपी गजाआड

शिव स्पंदन : प्रतिनिधी | शिरुर : दि. २७ ऑगस्ट : कवठे येमाई गावातील शेतकरी देवराम नानाभाऊ टेके (५०) यांचा पैशांच्या वादातून खून झाला आणि गाव हादरले. आरोपींनी शेतात नेऊन निर्दयीपणे रॉडने वार करत जीव घेतला आणि मृतदेह उसाच्या शेतात फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु शिरुर पोलिसांच्या अचूक तपास आणि धडाकेबाज कारवाईमुळे अवघ्या…

Read More

लाडकी बहीण योजनेचा गैरवापर – लाखो लाभार्थ्यांची पात्रता संशयात

शिव स्पंदन : प्रतिनिधी | मुंबई : महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत प्रचंड गैरव्यवहार झाल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्यातील तब्बल २६ लाखाहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असला तरी त्या प्रत्यक्षात पात्र नव्हत्या, असे प्राथमिक तपासणीत उघड झाले आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे…

Read More
error: Content is protected !!